जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जामडी गावात पिर गौबान शाहावली बाबा यांच्या यात्रा उत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा हिंदू–मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानली जाते. यात्रेनिमित्त पारंपरिक कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. कुस्तीच्या मैदानात नामवंत मल्लांनी हजेरी लावत उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाचा आनंद घेतला.