पुण्याच्या भोर तालुक्यातील उत्रौली गावात, ग्रामदैवत सोनारसिद्ध श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या 150 पैलवानांनी सहभाग घेतला. यावेळी कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्तीपटूंच्या कुस्त्या घेण्यातं आल्या. ग्रामस्थ मंडळाकडून भरविण्यात आलेला हा निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.. कुस्ती जिंकणाऱ्या स्पर्धकांसाठी चांदीच्या गदेसह रोख एक हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात बक्षिसे आली होती.