सांगलीमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध इराण कुस्ती स्पर्धेत इराणच्या मल्लाने बाजी मारत छत्रपती केसरी किताब पटकावला आहे. सांगलीतल्या कुस्तीप्रेमी ग्रुप तर्फे भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात प्रमुख कुस्ती पार पडली. सुमारे अर्धा तास रंगलेल्या कुस्तीमध्ये मिर्झा इराण याने शेरा गुजर वर कब्जा घेत गुणावर छत्रपती केसरी किताब पटकावला.