बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी इथं प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला राणूबाई देवीचा यात्रा महोत्सव असतो. या यात्रेत नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी ही पर्वणीच असते. यामध्ये 12 गाड्या ओढल्या जातात. कुस्त्यांचे जंगी सामने झाले असून यामध्ये महाराष्ट्रातून शेकडो पैलवानांनी सहभाग नोंदवला होता.