पुण्याच्या भोर तालुक्यातील वाठार हिमा गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त कुस्ती मैदान भरविण्यात आलं. या कुस्त्यांमध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 हून अधिक मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी कुस्ती क्रीडा प्रकारातील सर्व वजन गटातील कुस्तीपटूंच्या कुस्त्या घेण्यात आल्या होत्या.