एकीकडे शेतकऱ्यांसाठी नापिकीचे वर्ष असताना दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा दरने येथील प्रफुल कापसे या शेतकऱ्याने आपल्या 12 एकर शेतात अनोख्या पध्दतीने तुरीची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. शून्य मशागत शेती अंतर्गत एसआरटी पद्धतीने शेतात तुरीची लागवड केली आहे. शिवाय नांगरणी, डवरणी न करता हे पीक घेतले आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचला आहे. उत्पादन खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याचा फायदा झाला आहे.12 एकर शेतीत 10 लाख रुपयांचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले असून कापूस उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्याने तूर पिकाच्या माध्यमातून नफा कमावला आहे.