यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून यावर्षी १० लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी झाली. खुल्या बाजारापेक्षा प्रति क्विंटल १ हजार रुपये अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीसीआयला प्राधान्य दिले. त्यानंतर खुल्या बाजारात दर वाढल्याने शेतकरी तिकडे वळले, परिणामी सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर शुकशुकाट दिसला. ही खरेदी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरली.