ईसापूर, ता. पुसद येथील युवा शेतकरी संदीप नाईक यांनी दोन एकर आधुनिक केळी पीक घेतले होते. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने आणि व्यापाऱ्यांनी खरेदी न केल्याने कंटाळून त्यांनी उभ्या पिकावर जेसीबी फिरवला. लेकरासारखे वाढवलेले पीक नष्ट करताना त्यांच्या मनाला वेदना झाल्या. उत्पादन खर्च आणि मिळालेला भाव यात मोठी तफावत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.