यवतमाळमध्ये कर्जमाफी आणि पिक विम्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने धोंडी आंदोलनासह अर्धनग्न मोर्चा काढत आक्रमक पवित्रा घेतला. आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य गेट उघडून आत प्रवेश केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.