मार्च महिन्यातच यवतमाळकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सूर्य आग ओकू लागला असून शहराचा पारा 39 सेल्सिअस अंशावर पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. आज असलेलं तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्यात असते. मात्र मार्च महिन्यातच ही पायरी गाठल्याने यावर्षी तापमानात चांगलीच वाढ होण्याचे संकेत आहेत. सध्या मार्च महिना सुरू असून आणखी एप्रिल मे महिना बाकी आहे. या दोन महिन्यामध्ये पारा 43 ते 44 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी किंवा शेलाचा वापर करावा तसेच थंड पेय प्यावे जेणेकरून उन्हापासून आपले संरक्षण होईल तसेच नागरिकांनी सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.