यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान बाबा कंबलपोश यांच्या पुण्यतिथीनिमित्त आर्णी येथे मागील ९६ वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या उरूस शरीफला आज गुरुवारपासून (५ फेब्रुवारी) शाही संदलने सुरुवात होणार आहे. हा उर्स १० फेब्रुवारीपर्यंत चालेल, ज्यात कव्वाली, खंजिरी भजन स्पर्धा आणि कीर्तनासह अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.