यावल, चोपडा, रावेर परिसरातील केळी बागांना गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीचा जोरदार फटका बसला आहे. चांगल्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये समाधान होते, मात्र थंडीने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. नुकताच सावरू पाहणाऱ्या बाजारावरही याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.