यवतमाळ नगरपालिकेत शिवसेना उबाठाने निवडणुकीत 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगनात उभे केले होते. मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही. खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांच्यावर खापर फोडीत माजी विधानसभा प्रमूख संतोष ढवळे यांनी खासदार देशमुख यांच्या जाहीर सत्कार सभेचे आयोजन उत्सव मंगल कार्यालयात केले. याची माहिती मिळताच जिल्ह्य प्रमुख,संपर्क प्रमूख यांनी मंगल कार्यालयात जाऊन ही सभा उधळून लावली. यावेळी शाब्दिक बाचाबाची शिवसैनिकांमध्ये झाली.