बुलढाणा शहराची तहान भागविणारं येळगाव धरण संततधार पावसामुळे 100 टक्के भरलं आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानिमित्ताने आमदार संजय गायकवाड यांच्यासह नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं.