अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या कडकडीत थंडी पडत असून अनेक ठिकाणी किमान तापमान 8 अंश सेल्सियस खाली गेलय...या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 11 डिसेंबर पर्यंत दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असूनजिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवलीय...थंडीचा कडाका वाढल्याने जनजिवनावर त्याचा परिणाम झालाय....सकाळी 9 वाजेपर्यंत दुध संकलन पुर्ण होत असताना आता उशिरापर्यंत दुध संकलन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.थंडीच्या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाने केलय