धाराशिव जिल्ह्यात यंदा पुर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता रब्बी हंगामात फायदा व्हावा यासाठी जिल्ह्यात यंदा 23031 हेक्टरवर क्षेत्रावर राजमा पिकाची पेरणी झाली होती परंतु सद्य परिस्थितीत राजमा पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने धाराशिव जिल्ह्यातील 23 हजार हेक्टरवरील राजमाचे पिक संकटात सापडले आहे.ऐन फुले,शेंगा लावण्याच्या अवस्थेत राजमावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडाची पाने पिवळी पडुन वाळत आहेत.त्यामुळे राजमाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.