भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्त दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करत आहेत. मंदिरातील नंदीभोवती आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. हजारो शिवभक्त या ठिकाणी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहे