इंधन दरवाढ तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ येवला काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील विंचूर चौफुली येथे अनोखे आंदोलन केले . यावेळी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेट वाटप करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.