आंदोलनकर्त्यांनी महावितरणला पाच दिवसांची मुदत दिली असून, दिवसा वीज न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.