येवल्यातील कोर्ट रोडवर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी चोरट्यांनी ओरबाडली. रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गतिरोधकाचा फायदा घेत ४२ वर्षीय संगीता भागवत यांच्या गळ्यातील पोत लंपास केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.