दुबईत एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने मोफत आयफोन वाटण्याची घोषणा करत लोकांची मोठी गर्दी जमवली. एका मिनिटात रिकामे झालेले आयफोन बॉक्स खरेतर चॉकलेटने भरलेले होते. युनूस झारू नावाच्या या इन्फ्लुएन्सरने केलेला हा युक्तीवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या प्रँकने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.