वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून "जन्मोजन्मी हाच पती लाभावा" अशी मनोभावे प्रार्थना करतात. पण बीडमधील दोन तरुणांनी याच परंपरेला विनोदी वळण देत थेट वडाच्या झाडालाच प्रश्न विचारला आहे. लग्न जमत नसल्याने हतबल झालेल्या या तरुणांनी वडाला साकडं घालत "महिलांना सात जन्मांसाठी तोच नवरा मिळतो. पण आमचं पहिलं लग्न तरी कुणाशी होणार?" असा मिश्कील सवाल केलाय. तसेच या तरुणाने व्हीडिद्वारे लग्न होत नसलेल्या समस्येकडे लक्ष वेधून घेतलं.