वसई पश्चिमेकडील पापडी ते स्टेलादरम्यान टेम्पोला लटकून एका तरुणाचा धोकादायक प्रवास करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहरात धोकादायक प्रवास होत असल्यामुळे अपघातांची मालिका वाढू लागली आहे. धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होऊ लागली आहे.