वाशिम जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उगवलेली सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असून अनेक ठिकाणी पिकं करपू लागली आहेत. आधीच बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे.