मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परिसरात तीर्थक्षेत्र धुपेश्वर ते चारठाणा भवानी मंदिरापर्यंत भव्य कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी बम बम भोलेचा गजर झाला आणि कावड यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेकडो तरुणांनी यावर्षी या कावड यात्रेत सहभाग नोंदवला.