शनिवारी पुण्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर काही तरुण सेल्फीसाठी राहुल गांधी यांच्या वाहनामागे धावले, त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या कारची काच खाली करत त्यांना नमस्कार केला. मात्र यामुळे पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली.