चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावाविरोधात उद्योजकांनंतर आता स्थानिक तरुणही रस्त्यावर उतरले आहेत. उद्योगमंत्र्यांनी समस्या सोडवण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी मागितला असला, तरी या मुदतीत प्रश्न सुटतील का, याबाबत तरुण आणि उद्योजकांमध्ये साशंकता आहे.