कोल्हापूर जिल्हा युवासेनेच्या वतीने गडहिंग्लज येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करत आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला.