अभिनेता झायेद खान यांनी पत्नी मलायकासोबत २० व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिर्डी भेटीचे कारण सांगितले आणि नुकत्याच निधन झालेल्या आई झरीन खान यांच्या आठवणींना उजाळा दिला. आईबद्दल बोलताना झायेद खान भावुक झाले. त्यांच्या या भेटीने चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.