रायगड जिल्ह्यातील खोपोलीचा प्रसिद्ध झेनिथ धबधबा सध्या पर्यटकांनी गजबजला आहे. पावसामुळे धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी आठवड्याच्या सातही दिवस पर्यटकांची गर्दी होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खोपोलीत पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य खुलून येतं. डोंगरदऱ्यांमधून कोसळणारा झेनिथ धबधबा पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरला आहे.