पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी घोडेगाव तहसीलदार कार्यालयाच्या गेट वर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांना मोठा संघर्ष करायला लागला.