SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 1 October 2022 -TV9

मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलचा उद्या मेगा ब्लॉक आहे. हा मेगा ब्लॉक तिन्ही लाईनवर असणार असून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Oct 01, 2022 | 9:35 AM

मुंबईमध्ये रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई करांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज शिर्डीत जात साईंचे दर्शन घेणार आहे. तसेच पु्ण्यातील चांदणी चौकातील पूल आज पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतून वळवण्यात येणार आहे. दरम्यान हा पूल पाडल्यानंतर पाच दिवसात वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलचा उद्या मेगा ब्लॉक आहे. हा मेगा ब्लॉक तिन्ही लाईनवर असणार असून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. चिपळूनमध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देवीच्या दारात जाखडी नृत्य केलं. तर मुंबई विद्यापीठातील आयडॉल प्रवेशासाठी 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें