Murlidhar Mohol | सुप्रिया सुळेंनी पुराव्यासह आरोप करावे – मुरलीधर मोहोळ

पुण्यात महानगपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

पुण्यात महानगपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. प्रचाराला लागा; पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे भाकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर आता पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुळे यांना शुभेच्छा देत टीका केलीय. तसेच राष्ट्रवादीने असं काय केलंय की, जनता आम्हाला बाजूला करेल असा सवालदेखील विचारलाय.

रलीधर मोहोळ काय म्हणाले ?

पुण्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्ताबदलासाठी तयारीला लागा. पुढचा महापौर आपल्याच पक्षाचा होईल असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. त्यानंतर मोहोळ यांनी सुळे यांना काही प्रश्न केले आहेत. “राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा आहेत. यांनी गेली 15 वर्षे शहराच्या विकासासाठी काय केलं. राष्ट्रवादीने असं काय केलं की, पुणेकर आम्हाला बाजूला करून त्यांना संधी देतील,” असं मोहोळ यांनी विचारलंय.

Published On - 4:50 pm, Sun, 31 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI