Adv. Gunratna Sadavarte | आमचा पण दत्ता सामंत होईल असं म्हणतात, आम्ही कर्मचाऱ्यांसाठी लढणार

मागील अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. पाऊस तसेच थंडीमध्ये हे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात मांडली. तशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील केली आहे.ते आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सभेत बोलत होते. “आझाद मैदानात बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही भूमिका मी आज माननीय उच्च न्यायालयात मांडली. त्यामुळे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची वाट न पाहता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत. लालपरीला दगड मारणारे हे सत्तेतील लोक असू शकतात आणि ही मंडळी या संपात फूट पाडू बघत आहे,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI