Special Report | घाटकोपरमध्ये विहिरीत पडलेल्या ‘त्या’ कारचं पुढे काय झालं?

मुंबईच्या घाटकोपरमध्ये विहिरीत पडलेल्या 'त्या' कारचं पुढे काय झालं? असा सवाल काहीजण उपस्थित करत आहेत. तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्विमर्स आणि क्रेनच्या मदतीने तब्बल 12 तासांनंतर ती कार बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईच्या घाटकोपर परिसरात पार्क केलेली कार एका विहिरीत बुडाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. कार बुडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कार नेमकी का बुडाली याबाबत अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र, ही कार बुडण्याचे नेमके कारण समोर आले आहे. अर्धी विहीर झाकून त्यावर गाडी पार्क केल्यामुळे शेवटी तीच गाडी थेट विहिरीत बुडाली आहे. दरम्यान, विहिरीत पडलेल्या ‘त्या’ कारचं पुढे काय झालं? असा सवाल काहीजण उपस्थित करत आहेत. तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्विमर्स आणि क्रेनच्या मदतीने तब्बल 12 तासांनंतर ती कार बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

(What happened to that car which fell into a well in Ghatkopar?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI