Special Report | लसीकरण केंद्राचं उद्धाटनाला जोरदार पोस्टरबाजी, महापालिका आयुक्त कारवाई करणार?

मुंबईतल्या विलेपार्ले येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचं उद्घाटन होणार म्हणून शिवसैनिकांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता कारवाईची मागणई केली आहे.

लसीकरणाचा कार्यक्रम असो अथवा लसीकरण केंद्राचं उद्घाटन असो, अशा कोणत्याही कार्यक्रमावेळी अजिबात पोस्टबाजी करु नका, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. मात्र शिवसेनेलाच याचा विसर पडलेला दिसतोय. कारण मुंबईतल्या विलेपार्ले येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचं उद्घाटन होणार म्हणून शिवसैनिकांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता कारवाईची मागणई केली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आता कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Will Municipal Commissioner take action Against ShivSena after the poster campaign for the inauguration of the vaccination center in Vile Parle Mumbai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI