‘उद्धवजी, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग होतंय’, Narayan Rane यांचा Uddhav Thackeray यांना सल्ला

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. (Narayan Rane)

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. उद्धवजी, तुम्हाला चुकीची माहिती ब्रीफिंग केली जात आहे. त्यात सत्य नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची मााहिती तुम्ही गुप्तपणे घ्या, असं नारायण राणे म्हणाले. चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी संबोधित करताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलं. उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI