'अशोका'चं झाड उंच वाढतं, सावली मात्र मिळत नाही, अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्री बरसले

लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नांदेडमधील सभेत अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका केली.

'अशोका'चं झाड उंच वाढतं, सावली मात्र मिळत नाही, अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्री बरसले

नांदेड : अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं, त्याची सावली मात्र कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली शोधलेली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांच्यावर नाव न घेता टीका केली.

‘या लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे. एक नवा इतिहास तुम्ही केलेला आहे.’ असं फडणवीस म्हणाले. महा जनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडवणीस यांनी नांदेडमध्ये सभा घेतली.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. 2014 मध्ये मोदीलाटेत काँग्रेसने ज्या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यात नांदेडची एक जागा जिंकली होती. त्यानंतरही अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेची निवडणूक जिंकली होती. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. चव्हाणांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. त्यानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनी या सभेत समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाही. पण मी एक धोरण घेतलंय ‘जिना यहां, मरना यहां’ अशा शब्दात भाजपचे नांदेडमधील (Nanded BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी मुख्यमंत्र्यांना नांदेडला भाजपचा बालेकिल्ला करण्याचं आश्वासन दिलं.

आतापर्यंत चार पक्ष बदलले, आता जिना यहां, मरना यहां : चिखलीकर

‘मी जो काही आहे, त्याची दोनच कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्ष आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझ्यासारखा मीच आहे. आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाहीये. पण मी एक धोरण घेतलंय जीना यहा मरना यहा.’ असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस साहेब, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुमचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करणार. त्या भागामध्ये तुम्हाला जो अपेक्षित भारतीय जनता पक्ष आहे. तो नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होणार, तो नारा सार्थ केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासनही चिखलीकरांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेसाठी मुख्यमंत्री नांदेडला आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *