माझ्याकडे सर्व पुरावे, शाहांनी सांगितलं तर उघड करेन, खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर

पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी पाडापाडी करणाऱ्यांची नावं उघड करेन, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिलं.

माझ्याकडे सर्व पुरावे, शाहांनी सांगितलं तर उघड करेन, खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर

जळगाव : गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पाडापाडी करणाऱ्या पक्षातील नेत्यांची नावानिशी यादी मी वरिष्ठांकडे जमा केली आहे. पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती सर्वांना सांगेन, असं उत्तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse answers Girish Mahajan) दिलं.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं.

भाजपने पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी जळगावात गेले, मात्र खडसेंनीच बैठकीला येण्यास बराच उशीर केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते कन्या रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यासह हजर झाले.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. गिरीश महाजन यांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर महाजन आणि खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस संरक्षणात बैठका झाल्या. पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु एकनाथ खडसे यांनी बैठक स्थळी हजेरी लावण्यास दुपार केली.

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

‘विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावं एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचं ते सांगत आहेत. त्यांनी ती नावं गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत’, असं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलं होतं.

…म्हणून रोहिणी खडसेंचा पराभव, गिरीश महाजन यांनी पहिल्यांदाच कारण सांगितलं!

‘कुणीच कुणाला पाडत नसतं. त्यांना अपयश आलं, याचं आम्हालाही वाईट वाटतं. मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे हे यापूर्वीही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात 1200 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोठी मोदी लाट असतानाही केवळ 8500 मतांनी निवडून आले आहेत’, असंही महाजन म्हणाले होते.

नाराज आपोआपच एकत्र येतात, खडसेंचे 10 रोखठोक मुद्दे

‘यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळेच दीड-दोन हजार मतांचा फरक पडला’, असा अंदाज महाजनांनी (Eknath Khadse answers Girish Mahajan) वर्तवला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *