"फडणवीस-पवारांचं मंत्रिमंडळ इतकं मोठं आहे की त्यांना एकमेकांना भेटण्याशिवाय पर्याय नाही"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर (Devendra Fadnavis Ajit Pawar meeting) कोपरखळी लगावली आहे.

"फडणवीस-पवारांचं मंत्रिमंडळ इतकं मोठं आहे की त्यांना एकमेकांना भेटण्याशिवाय पर्याय नाही"

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर (Devendra Fadnavis Ajit Pawar meeting) कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं मंत्रिमंडळ इतकं मोठं आहे, की त्यांना एकमेकांनाच भेटावं लागेल, इतर पर्याय नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी ((Jayant Patil on Ajit Pawar) )त्यांना टोला लगावला.

जयंत पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्रांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री एवढं मोठं त्यांचं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे त्या दोघांना त्यांच्याशिवाय भेटण्यासाठी कोणी दुसरं नाही. त्यामुळे ते दोघेच एकमेकांना भेटणार. त्या दोघांनी काय चर्चा केली हे माहित नाही, पण आमदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी खाते वाटपाची चर्चा झाल्याची शक्यता आहे.”

तुम्ही दोघंच आहात अजून कुणालाही मंत्रीच केलेलं नाही. माग खातं कुणाला वाटणार आहेत. त्यामुळे जो प्रकार सुरु आहे तो हास्यास्पद आहे. रात्री तयार झालेलं हे सरकार रात्रीच कधीतरी जाईल, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

“राष्ट्रवादीच्या एकूण 54 आमदारांपैकी 52 आमदार आमच्यासोबत”

राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडून आलेल्या 54 आमदारांपैकी एकूण 52 आमदार असल्याचाही दावा जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, “आमचे 54 आमदार विधानसभेत निवडून आले आहेत. आता 52 आमदार आमच्यासोबत आहेत. एक आमदार हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे आणि एक स्वतः अजित पवार आहेत. सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या भोवती राज्यातील सरकारी व्यवस्थेचा प्रचंड पहारा आहे. महाराष्ट्रात असे आमदार पळवण्याचे उद्योग कधीच झाले नव्हते. भाजपने तेही सुरु केले आहेत. आमदार पळून जाऊ नये यासाठी पोलिसांचा उपयोग होत आहे हे दुर्देवी आहे.”

भाजपच्या सर्व गोष्टी उघड करू तेव्हा ते कोणकोणते उद्योग करत आहेत हे सर्वांसमोर येईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *