ठाकरे मंत्रिमंडळात देसाई सर्वात वयस्कर, संपत्ती सर्वात कमी, सर्वाधिक श्रीमंत कोण?

उद्धव ठाकरे यापूर्वी कधीच निवडणुकीच्या रिंगणात न उतरल्यामुळे त्यांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध नाही.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन-दोन नेत्यांनी मंत्रिपदाची (Property of Thackeray Government Ministers) शपथ घेतली.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांची सरासरी मालमत्ता (Property of Thackeray Government Ministers) 15 कोटी रुपये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ 24 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत आहेत, तर सुभाष देसाई यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार (2014-15) त्यांच्याकडे 8 कोटींची संपत्ती आहे.

एकनाथ शिंदेंची संपत्ती 14 कोटी, जयंत पाटील यांची संपत्ती 16.95 कोटी, नितीन राऊत यांच्याकडे 17 कोटी, तर बाळासाहेब थोरातांची संपत्ती 12.08 कोटी रुपये आहे. उद्धव ठाकरे यापूर्वी कधीच निवडणुकीच्या रिंगणात न उतरल्यामुळे त्यांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध नाही.

नवीन मंत्रिमंडळात 55 वर्षांचे एकनाथ शिंदे सर्वात तरुण, तर शिवसेनेचेच 77 वर्षीय सुभाष देसाई सर्वात वयस्कर मंत्री ठरले आहेत. छगन भुजबळ 71 वर्षांचे, नितीन राऊत 67 वर्षांचे, बाळासाहेब थोरात 66 वर्षांचे, तर जयंत पाटील 57 वर्षांचे आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 59 वर्षांचे असून त्यांचं शालेय शिक्षण दादरमधील बालमोहन विद्यामंदिर या शाळेत झालं. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पुढील शिक्षण घेतलं.

बाळासाहेब थोरातांची 2 महिन्यापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली!

57 वर्षीय जयंत पाटील यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील तगडे दावेदार मानले जातात.

विशेष म्हणजे जयंत पाटील यांचंही शिक्षण बालमोहनमध्येच झालं. जयंत पाटलांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही एकाच शाळेतून असल्याचा दुर्मीळ योगायोग पाहायला मिळेल. अर्थात दोघांनीही एकत्र शपथ घेतल्यामुळे बालमोहनकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. हा शपथविधी झाला, ते शिवाजी पार्कचं मैदान बालमोहन शाळेला लागूनच असल्यामुळे दोघांनी शपथ घेतली, त्याची साक्षीदार त्यांच्या शाळेची पवित्र वास्तूही होती.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत हे सर्वात सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे पीएचडी पदवी आहे. सर्वात कमी शिक्षण शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं झालेलं आहे. ते दोघंही दहावी पास (Property of Thackeray Government Ministers) असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत रिक्षा चालवायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित होऊन ते शिवसेनेत दाखल झाले.

सुभाष देसाईंनी पत्रकारितेतून कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेच्या ‘थिंक टँक’मध्ये असलेल्या देसाईंकडे उद्योग मंत्रालयाची धुरा होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पदवीधारक आहेत. थोरात हे 1985 पासून सलग आठव्यांदा आमदारपदी निवडून आलेले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *