हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, संदीप देशपांडेंची शायरी

'वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तरह आपको प्यारे होते' असं मनसेच्या संदीप देशपांडेंनी ट्विटरवर लिहिलं आहे.

हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, संदीप देशपांडेंची शायरी

मुंबई : शिवसेनेला एकनिष्ठेवरुन टोला मारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शायरी ट्वीट केली आहे. ‘वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तरह आपको प्यारे होते’ असं देशपांडेंनी ट्विटरवर लिहिलं आहे. कोणे एके काळी शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची टाळी नाकारल्यावरुन त्यांनी अप्रत्यक्ष चिमटे काढल्याचं दिसत (Sandeep Deshpande Tweet on Shivsena) आहे.

‘वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी काँग्रेस राष्ट्रवादी की तराह आपको प्यारे होते, पर थोडीसी आपके फितरत मैं
वफा भी कम है, वरना जिती हुई बाजी तो ना हारे होते……’ अशी शायरी संदीप देशपांडे यांनी लिहिली आहे.

गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला

‘एक वेळ असती, की तुम्ही आमचे असता, आम्हीही काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे तुम्हाला प्रिय असतो, पण तुमच्या स्वभावातच निष्ठा कमी होती, नाहीतर तुम्ही जिंकलेली बाजी गमावली नसती.’ अशा आशयाची ही शायरी आहे.

शिवसेनेने भाजपला अलविदा करत अनेक वर्षांची युती तोडली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर
शिवसेनेने हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास सोडला. आता भिन्न विचारधारेच्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत
महाराष्ट्रात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होण्याची चिन्हं आहेत. यावरुन देशपांडेंनी कानपिचक्या लगावल्या आहेत.

याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं निवासस्थान 10 जनपथवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चाललेल्या मॅरेथॉन बैठकांवरुनही संदीप देशपांडेंनी टोमणे मारले. अग्निपथ चित्रपटातील डायलॉगवरुन ‘ले शपथ ले शपथ ले शपथ 6/10 जनपथ जनपथ जनपथ अग्निपथ अग्निपथ अग्निपथ’ असं ट्वीट (Sandeep Deshpande Tweet on Shivsena) त्यांनी केलं होतं.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *