‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी राजकारणातील पुनरागमनाचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे (Chhagan Bhujbal on new Political Birth and Sharad Pawar ).

'हा' निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 5:56 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी मागील काही वर्षांचा राजकीय प्रवास मोठा अडचणीचा राहिला. अनेक दिवस तुरुंगात राहण्याचीही नामुष्की छगन भुजबळ यांच्यावर आली होती. मात्र, सध्या ते पुन्हा एकदा राजकारणात जोमाने सक्रीय झाले. राजकारणातील या पुनरागमनाचं श्रेय छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे (Chhagan Bhujbal on new Political Birth and Sharad Pawar ). शरद पवार यांनी माझा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश करुन मला राजकीय पुनर्जन्म दिला आहे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. ते महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्तआयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते (Chhagan Bhujbal on new Political Birth and Sharad Pawar ).

छगन भुजबळ म्हणाले, “महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात मला स्थान देऊन शरद पवारांनी मला राजकीय पूर्णजन्म दिलाय. माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानतो. आज बाळासाहेबांचा पुत्र राज्याची धुरा हाती घेत आहे याचा आनंद आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालेल. त्यासाठीच सर्वांनी चर्चा करुन हा किमान समान कार्यक्रम ठरवला आहे आणि त्यावर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत.

मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझी राजकीय आणि सामाजिक कामाची सुरुवात केली. त्यानंतर काही कारणाने मी काँग्रेसमध्ये गेलो. जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. आज मला आनंद आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ते महाराष्ट्राचं सरकार स्थापन करतील. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि त्यापुढे देखील सत्तेवर येईल.

शरद पवार यांनी ज्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला त्यात माझा समावेश आहे. कोणतं मंत्रिपद देणार यावर कोणताही निश्चिती झालेली नाही. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बसून यावर निर्णय घेतील. त्याआधी सरकार स्थापन करुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विश्वासदर्शक ठराव घ्यायचा आहे, असंही भुजबळ यांनी नमूद केलं.

Non Stop LIVE Update
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.