पक्षात आणि कुटुंबात उभी फूट, सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule get emotional )राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंब फुटल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये याबाबत भाष्य केलं आहे.

पक्षात आणि कुटुंबात उभी फूट, सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule get emotional) राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंब फुटल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे पत्रकारांसमोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या (Supriya Sule get emotional )डोळ्यात पाणी दिसलं. सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडल्यानंतरच मी बोलेल असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं.


सुप्रिया सुळे यांनी आपल्या पहिल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पक्ष आणि कुटुंब फुटल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं दुसरं स्टेटस देखील टाकलं. यात त्यांनी अजित पवारांच्या या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांचं दुसरं स्टेटस

आयुष्यात तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? माझ्या आयुष्यात कधीही इतकी फसवणूक झाल्याचं वाटलं नाही, पाठराखण केली, प्रेम दिलं त्याबदल्यात परत काय मिळालं?


अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना याची कल्पना होती, असंही म्हटलं. त्यामुळे या निर्णयाला शरद पवार यांची देखील मुक संमती होती असंही बोललं गेलं. मात्र, काही वेळातच शरद पवार यांनी ट्विट करत भाजपला पाठिंब्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक असल्याचं स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांनी या सर्व घटनाक्रमांवर थेट काहीही भाष्य केलेलं नाही. त्यांनी ट्विटरवर शरद पवार यांचं ट्विट करत मात्र, त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधून त्यांची भावना समोर आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *