5 दिवसांचे कपडे, आधार-पॅन कार्ड घेऊन या, उद्धव ठाकरेंच्या सेना आमदारांना सूचना

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. चर्चा आणि बैठकांचा पूर (Shivsena MLA Meeting) आला असताना सरकार कोण स्थापन करणार याविषयी काहीही स्पष्टता येत नसल्याचंच चित्र आहे.

5 दिवसांचे कपडे, आधार-पॅन कार्ड घेऊन या, उद्धव ठाकरेंच्या सेना आमदारांना सूचना

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. चर्चा आणि बैठकांचा पूर (Shivsena MLA Meeting) आला असताना सरकार कोण स्थापन करणार याविषयी काहीही स्पष्टता येत नसल्याचंच चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आता शिवसेनेने आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक (Shivsena MLA Meeting) बोलावली आहे. यावेळी आमदारांना नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक आमदाराला आपल्या सोबत 5 दिवसांचे कपडे, आधारकार्ड आणि पॅनकार्ड ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे याची बरिच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी (22 नोव्हेंबर) पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा अज्ञात ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच या सर्व आमदारांना 5 दिवसांचे कपडे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत आणण्यास सांगितले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर आमदारांची ओळख परेड होत असताना काहीही अडचण येऊन नये म्हणून असं केलं जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भाजपपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यात अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याने शिवसेनेत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील शिवसेनेसोबत सरकार स्थापनेविषयी गोंधळाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा देण्याकडे कल आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला जात असल्याचं सांगितलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *