वर्षातून एकदा करा 'या' ४ ब्लड टेस्ट्स

कंप्लीट ब्लड काऊंट  

संपूर्ण रक्ताची गणना आपल्या अनेक अवयवांच्या आरोग्याबद्दल सांगते, म्हणून ही एक महत्त्वाची चाचणी आहे. संपूर्ण रक्त गणना चाचणीद्वारे, आपल्याला यकृत, हृदय आणि किडनीबद्दल माहिती मिळते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या रक्तात असलेल्या पेशींची तपासणी केली जाते. 

किडनी फंक्शन टेस्ट

किडनी फंक्शन टेस्टद्वारे किडनीच्या आरोग्याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे कारण किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकते. हे घटक किडनी फंक्शन टेस्टमध्ये तपासले जातात.

थायरॉईड टेस्ट

थायरॉईड एक सायलेंट किलर आहे. हा रोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. जेव्हा हा रोग खूप धोकादायक होतो तेव्हा त्याची लक्षणे दिसतात. थायरॉईडची समस्या निद्रानाश, तणावासह आहारात सोडियम आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते. म्हणूनच थायरॉईड चाचणी वेळीच करणं देखील खूप महत्वाची आहे.

कोलेस्ट्रॉलची चाचणी

कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे हृदयाच्या आरोग्याची स्थिती कळते. या चाचणीमध्ये एचडीएलचे आकार आणि त्यांचे कण निश्चित केले जातात. ही चाचणी सहसा कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल, एचलडीएल आणि कोलेस्टेरॉल/एचडीएल गुणोत्तर तपासते.