वर्कआऊट करण्यापूर्वी हे टाळा

वर्कआऊटपूर्वी हे टाळा

गोड पदार्थ

वर्कआऊटपूर्वी साखरयुक्त अन्न खाऊ नये. त्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते, ज्यामुळे आपल्या पोटात जडपणा जाणवतो तसेच हे पदार्थ खाल्ल्याने ऊर्जा पातळी कमी होते आणि झोप देखील येते.

वर्कआऊटपूर्वी हे टाळा

जास्त आहार

कसरत करण्यापूर्वी कधीही जड अन्न खाऊ नका. तळलेले पदार्थ, उच्च चरबीयुक्त पदार्थ आणि अधिक अन्न खाण्यामुळे, आपल्याला खूप थकवा जाणवायला लागतो. ज्यामुळे वर्कआऊट करण्यात अडचण येते. 

वर्कआऊटपूर्वी हे टाळा

मसालेदार अन्न

जास्त मसालेदार अन्नामुळे अपचन वाढते. यामुळे कधीकधी आपल्या पोटासंदर्भात अनेत त्रास उद्भवतात. त्यामुळे कसरत करणे कठीण होते. म्हणून कसरत करण्यापूर्वी मसालेदार किंवा तेलकट अन्न खाऊ नका.

वर्कआऊटपूर्वी हे टाळा

फायबरयुक्त आहार

बहुतेक आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहाराची शिफारस करतात. पण वर्कआऊटच्याआधी ओट्स, व्हिट ब्रेड सँडविच आणि पास्ता यासारख्या गोष्टी खाल्ल्यास त्रास होण्याची शक्यता अधिक असते.