परिणीती चोप्राचा पती राघव चड्ढाला 'हा' गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि..

01 May 2024

Created By: Shital Munde

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत असते

परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत उदयपूरमध्ये अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले

लग्नाला काही महिने पूर्ण झाली असतानाच राघव याला गंभीर आजार झालाय

हेच नाही तर सध्या तो ब्रिटनमध्ये उपचार देखील घेत आहे

राघव चड्ढा याच्या डोळ्याची सर्जरी झालीये आणि त्याच्यावर ब्रिटनमध्ये उपचार सुरू आहेत

जर वेळीच त्याला उपचार मिळाले नसते तर त्याची दृष्टी देखील गेली असती

राघव चड्ढा याच्यासोबत विदेशात परिणीती असल्याचे देखील सांगितले जातंय