24 August 2025

Created By: Atul Kamble

PM KISAN YOJANA : कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही 21 वा हप्ता ?

Created By: Atul Kamble

केंद्र सरकारने अल्प भूधारक शेतकरी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना आणली आहे.

या योजनेत दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो

केंद्र सरकार येत्या ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान सन्मान योजनेचा 21 वा हप्ता जारी करु शकते

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ई-केवायसी केली नाही, त्यांना 21 वा हप्ता मिळताना अडचण येऊ शकते

 ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी ( व्हेरीफीकेशन ) केले नसेल त्यांचा 21 वा हप्ता मिळण्यात अडचण येईल

या शिवाय ज्या शेतकऱ्यांनी बँक अकाऊंटशी आधारकार्ड लिंक केलेले नाही त्यांनाही 21 वा हप्ता मिळणे कठीण होऊ शकते

ज्यांनी अर्ज करताना चुकीची माहीती दिली असेल त्या शेतकऱ्यांनी 21 वा हप्ता मिळताना अडचण येईल.