6 मे रोजी न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केलेला मेट गाला खूपच संस्मरणीय ठरला.
यावर्षी, भारत आणि परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये भाग घेतला
आलिया भट्टने भारतीय परिधान साडीची निवड केली. तिचा हा लूक जगभरातील लोकांना खूप आवडला होता.
मेट गाला लूक शेअर केल्यानंतर आलिया भट्टने या कार्यक्रमाचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे.
आलियाने तिच्या लहानपणातील एक प्रसंगही शेअर केला, 'जेव्हा ती नववीत शिकत होती.
शिक्षक दिनी आलिया साडी नेसून शाळेत गेली होती. तिने पहिल्यांदाच साडी नेसली होती.
आलियाने सांगितले की, जेव्हा ती शाळेत पोहोचली तेव्हा तिच्या साडी सुटली होती.
अभिनेत्रीने सब्यसाची साडी परिधान केली होती, अनैता श्रॉफ अदजानियाने स्टाइल केली होती.